Nagpurcity

Simply The Best City

आधार डीलिंक करण्यासाठी पंधरा दिवसांत योजना आखा!

ग्राहक प्रमाणीकरणासाठी घेण्यात आलेला आधार क्रमांक डीलिंक करण्यासाठी एक योजना तयार करून १५ दिवसांत ती आमच्यापुढे सादर करा, असे निर्देश भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. आधारकार्डच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने हे निर्देश दिले आहेत.