Nagpurcity

Simply The Best City

गीता गोपीनाथ IMFच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ

आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञपदी भारतीय वंशाची अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गीता सध्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २०१८ च्या अखेरीस मारीस ओब्स्टफील्ड हे निवृत्त होणार असून त्यांच्यानंतर गीता गोपीनाथ या मुख्य अर्थशास्त्रज्ञपदाचा पदभार स्वीकारतील.