Nagpurcity

Simply The Best City

गुजरात्यांकडे १८ हजार कोटींचा ब्लॅक मनी

देशातील काळ्या पैशांची साठवणूक करण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केली. त्यातून सरकारला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी केंद्र सरकारने सुरू केलेल्या इन्कम डिक्लरेशन स्कीम (आयडीएस)ला मोठं यश मिळालं आहे. या स्कीमनुसार २०१६ मध्ये अवघ्या चार महिन्यात गुजरात्यांनी १८ हजार कोटींची अवैध संपत्ती जाहीर केली आहे. या काळात देशभरातून २९ टक्के काळ्या पैशाची नोंद झाली आहे.