Nagpurcity

Simply The Best City

दिल्लीच्या वेशीवरच शेतकरी-पोलीस भिडले; आंदोलकांवर लाठीमार

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी आणि ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनीच शेतकऱ्यांना सरकारच्या दंडुकेशाहीचा अनुभव घ्यावा लागला आहे. संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या शेतकरी मोर्चावर पोलिसांनी पाण्याचा जोरदार मारा केला. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला.