Nagpurcity

Simply The Best City

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; घऱगुची गॅसही महागला

सततची इंधन दरवाढ व घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे आगामी सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. देशातील इंधन दरवाढीचे सत्र कायम असून सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैशांची तर, डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३० पैशांची वाढ जाहीर करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा पार केला.