Nagpurcity

Simply The Best City

अनिल अंबानींना देशाबाहेर जाण्यापासून रोखा; कोर्टात याचिका

स्वीडनची टेलिकॉम कंपनी इरिक्सन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनी दरम्यान सुरू असलेली कायदेशीर लढाई थांबताना दिसत नाही. कोर्टाच्या आदेशानंतरही अंबानी यांच्या कंपनीने ५५० कोटींची भरपाई दिलेली नाही. त्यामुळे अंबानीसह रिलायन्सच्या दोन बड्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास मज्जाव करावा, अशी मागणी करणारी याचिका इरिक्सनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.