Nagpurcity

Simply The Best City

आधार सुरक्षेसाठी आता ऑफलाइन व्हेरिफिकेशन

आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या वेळी वैयक्तिक गोपनीयता, डेटा सुरक्षिततेच्या चिंता सर्वांनाच सतावतात. म्हणूनच आधार कार्ड व्हेरिफिकेशन ऑफलाइन करण्याच्या प्रक्रियेवर केंद्र सरकार विशेष भर देत आहे. या प्रक्रियेत ऑथेंटिकेशनसाठी UIDAI सर्व्हरची आवश्यकता भासणार नाही. व्हेरिफिकेशनसाठी सरकार क्यूआर कोड आणि पेपरलेस केवायसी योजना आणत आहे. परिणामी बायोमेट्रिक डिटेल्स शेअर करण्याची तसेच आधारच्या सर्व्हरचा उपयोग करण्याची गरज उरणार नाही.