Nagpurcity

Simply The Best City

कोलकात्यात रुग्णालयाला मोठी आग; शेकडो रुग्ण बचावले!

कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या फार्मसी विभागाला आज बुधवारी पहाटे भीषण आग लागली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. रुग्णालयातल्या सुमारे २५० रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.