Nagpur City

Simply The Best City

मायावतींचा काँग्रेसला झटका; स्वबळावर लढण्याची घोषणा

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला घरघर लागली आहे. ‘भाजपला पराभूत करणं हे काँग्रेसचं ध्येय नाही. काँग्रेसला विरोधी पक्षातील घटक पक्षांना कमकुवत करण्यात अधिक रस आहे. त्याचाच एक भाग म्हणून बसपासोबत आघाडी करून बसपालाच संपवण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे’, असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेस आघाडीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.