Nagpurcity

Simply The Best City

अवघ्या तीन महिन्यांत एसटीचं भाडं पुन्हा वाढणार!

इंधनदरातील सततच्या वाढीने खासगी वाहनचालक, रिक्षा-टॅक्सीप्रमाणेच एसटी महांमडळही मेटाकुटीस आली आहे. दरवाढीने प्रवासी दुरावतील ही शक्यता असूनही वाढीव इंधन खर्चावर मार्ग काढण्यासाठी महामंडळाने १८ टक्क्यांपर्यंतच्या भाडेवाढीचा प्रस्ताव आखला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही वाढ किमान १० टक्क्यांपर्यंत राहील, असा कयासही मांडला जात आहे.