Nagpur City

Simply The Best City

चंदा कोचर यांनी राजीनामा देताच ICICI चे शेअर वधारले

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सीईओपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे. बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली असून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.