Nagpurcity

Simply The Best City

जीव वाचल्यानंतरही मुजोरी कायम

लोकलच्या दरवाजात स्टंटबाजी करताना तोल गेल्यानंतरही सहप्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचलेल्या तरुणीला या जीवावर बेतलेल्या प्रसंगानंतरही शहाणपण आलेले नाही. स्वत:ची चूक कबूल न करता उलट ‘लोकलमध्ये मेट्रोसारखे दरवाजे बसवावेत’ असा सल्ला या तरुणीने रेल्वेलाच दिल्याने सारेच अचंबित झाले आहेत.