Nagpurcity

Simply The Best City

पृथ्वीचं ‘शॉ’लिड शतक… पहिल्याच कसोटीत ३ विक्रम

देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपल्या दमदार खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉने आपल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. पृथ्वीने अवघ्या ९८ चेंडूत १०१ धावा ठोकून कसोटी सामन्यातील आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे पदार्पणातचं त्याने तीन विक्रमही रचले आहेत.