Nagpur City

Simply The Best City

मंत्र्यांना तुडवून तुडवून मारा; राजू शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी अत्यंत वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. ‘गावात येऊन खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना कपडे फाडून तुडवून तुडवून मारा. तुम्हीच त्यांना मारलं पाहिजे’, असं वादग्रस्त विधान शेट्टी यांनी केलं आहे. तर ‘शेट्टींनी सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोसकून यायलाही कमी करणार नाही’, असं धक्कादायक विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.