Nagpurcity

Simply The Best City

इंधन दरकपातीपूर्वी सरकारने केली ‘अशी’ कमाई

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची ‘वेळ साधली’ आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या भाजपशासित राज्यात आणि तेलंगण विधानसभेसाठी येत्या २ महिन्यात निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोग या राज्यांतल्या निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा आखत आहे, लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. पेट्रोल कपात करण्यापूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील कराच्या माध्यमातून आपली तिजोरी भरून घेतली आहे.