Nagpurcity

Simply The Best City

पुणे: लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून २ ठार, आठ जखमी

पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात दोघे जागीच ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. अपघातात सहा रिक्षा, एक कार व दुचाकींचं नुकसान झालं आहे.