Nagpurcity

Simply The Best City

भारताचा ६४९ धावांचा डोंगर; विंडीजची अवस्था केविलवाणी

राजकोट येथे सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने धावांचा डोंगर उभारून वेस्ट इंडिजसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. पहिल्या डावात भारताने ९ गड्यांच्या बदल्यात ६४९ धावा ठोकल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची दमछाक झाली असून पहिल्या डावात त्यांना ६ गड्यांच्या बदल्यात अवघ्या ९४ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे भारताने अजूनही वेस्ट इंडिजवर ५५५ धावांची आघाडी घेतलेली आहे.