Nagpurcity

Simply The Best City

मालेगाव: पुतण्याच्या मदतीनं आई-बापानं केला मुलीचा खून

मालेगावमधील कलेक्टर पट्टा भागातील १८ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलले असून, जन्मदात्या माता-पित्यानेच पुतण्याच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केल्याचे गुरुवारी उघड झाले. नेहा शरद चौधरी असे या मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातूनच कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे.