Nagpurcity

Simply The Best City

रेल्वे भरती: डावललेल्या मराठी मुलांची कैफियत

परीक्षा केंद्रावर आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड दाखवूनही २००हून अधिक मराठी परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना रेल्वे भरती बोर्डाद्वारे ‘ग्रुप डी’ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आधीच रेल्वे विभागात मराठी मुलांची संख्या कमी असताना क्षुल्लक त्रुटी काढून त्यांची संधी हिरावली जात असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे.