Nagpurcity

Simply The Best City

३१ जानेवारीपर्यंत राम मंदिराचं काम सुरू करा, अन्यथा पराभव अटळ

राम मंदिर- बाबरी मशीद वादावरील निर्णायक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होण्यापूर्वीच देशभरातील संतांनी राम मंदिराचा राग आळवला आहे. येत्या चार महिन्यात म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत राम मंदिराचं काम सुरू केलं नाही तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे, असा इशाराच साधू-संतांनी दिला आहे. विशेष म्हणजे १५-१६ संतांचं एक शिष्टमंडळ आज रात्रीपर्यंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून एक निवेदन देणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.