Nagpurcity

Simply The Best City

जावयाने संपवलं सासरचं अख्खं कुटुंब, हल्ल्याचे चार बळी

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. कुटुंबातल्या मायलेकी जावयाने केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या तर अन्य दोन गंभीर जखमींचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोर जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.