Nagpurcity

Simply The Best City

लोकसभा निवडणूक रिंगणात भाजपचे ‘स्टार’ उमेदवार

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित, ‘खतरो का खिलाडी’ अक्षयकुमार, स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग व कपिल देव यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींना २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या कल्पनेवर भाजपचे नेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. या ‘स्टार’ प्रचारकांच्या माध्यमातून शहरी मतदारसंघांमध्ये वातावरण निर्माण करून विजय निश्चित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.