Nagpurcity

Simply The Best City

उत्तर भारतीयांवरील हल्ले: ५६ गुन्हे दाखल, ४३१ अटकेत

गुजरातमध्ये होत असलेल्या मारहाणीमुळे भयभीत झालेल्या उत्तर भारतीयांनी मोठ्याप्रमाणावर स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर गुजरात सरकारने उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या ४३१ हल्लेखोरांना पकडले असून गुजरातमधून स्थलांतर करणाऱ्या उत्तर भारतीयांना पुन्हा गुजरातमध्ये परतण्याचं आवाहनही केलं आहे.