Nagpurcity

Simply The Best City

मुंबई ठप्प पाडण्याची भाषा; निरुपमांविरुद्ध मनसे आक्रमक

‘लक्षात ठेवा मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात…जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही तर मुंबई ठप्प होईल’ असं वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेकडून सोशल मीडियावर निरुपमांविरोधात जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे. या पोस्टरमध्ये निरुपमांना थेट भटका कुत्रा म्हणण्यात आलं आहे.