Nagpurcity

Simply The Best City

ज्येष्ठ पत्रकार सुहास फडके यांचं निधन

राजकारण, अर्थकारण व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार, जेष्ठ पत्रकार व महाराष्ट्र टाइम्सचे माजी वरिष्ठ सहाय्यक संपादक सुहास फडके यांचं आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा रंजना फडके व कन्या साहिली असा परिवार आहे. फडके यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.