Nagpurcity

Simply The Best City

दिवाळीत एसटी प्रवास महाग; १ ते २० नोव्हेंबर १० % भाडेवाढ

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसासाठी ही भाडेवाढ लागू असेल. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीतच सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.