Nagpurcity

Simply The Best City

भाजप मध्य प्रदेश, छत्तीसगड राखणार; राजस्थान गमावणार!

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘टाइम्स नाऊ’ने देशातील सर्वात मोठे निवडणूकपूर्व सर्वेक्षण घेतले आहे. या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ फुलेल आणि राजस्थानात वसुंधरा राजे यांना मात देत काँग्रेस मोठा विजय मिळवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.