Nagpurcity

Simply The Best City

यूपी, बिहारींवरील हल्ल्यामागे अल्पेश ठाकोर; काँग्रेसची गोची

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे आमदार अल्पेश ठाकोरचं नाव आल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. युपी आणि बिहरामधून आलेल्या परप्रांतीयांना विरोध करण्यास अल्पेश यांनीच सुरुवात केली होती. पण ही चाल उलट पडल्याने आता काँग्रेस डॅमेज कंट्रोल करण्याच्या तयारीत आहे. अल्पेश यांचा या हल्ल्यांमागे हात असेल तर त्यांना अटक व्हायला हवी, असे काँग्रेससह पाटीदार नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी या सर्वांनाच सांगावे लागले आहे.