गुड न्यूज! आता कॉलेजात मूळ प्रमाणपत्रे देण्याची गरज नाही
आता कॉलेजात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रे ( ओरिजिनल सर्टिफिकेट) देण्याची गरज नाही. महाविद्यालये कोणत्याही विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे आपल्याकडे ठेवू शकत नाहीत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्यांना संपूर्ण शुल्क देणं महाविद्यालयांना बंधनकारक असेल. तसं न केल्यास महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.