Nagpurcity

Simply The Best City

ज्योतिषाचं ऐकून कुमारस्वामींची नियोजित कार्यक्रमांना बगल

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचा ज्योतिष शास्त्रावर असलेला विश्वास काही लपून राहिलेला नाही. पण कुमारस्वामी यांनी ज्योतिषाचं ऐकून चक्क सरकारी कार्यक्रम रद्द केल्याचं उघड झालं आहे. कुमारस्वामी यांना त्यांच्या ज्योतिषाने मंगळवारी दुपारपर्यंत घराबाहेर पडू नका असं सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारपर्यंतचे सर्व कार्यकम पुढे ढकलेले.