Nagpur City

Simply The Best City

तितली ओडिशाच्या दिशेने; ३ लाख लोकांना हलवले; शाळा २ दिवस बंद

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले शक्तिशाली ‘तितली’ चक्रीवादळ अत्यंत तीव्र झाले असून ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर, ओडिशा सरकारने राज्यात ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे. पाच किनारी जिल्ह्यांमधील तब्बल तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.