नागपूरमध्ये बसची डंपरला धडक; पाच ठार
उमरेड मार्गावरील उदासा शिवारात मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उभ्या डंपरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच ठार तर २९ प्रवासी जखमी झाले. युवक काँग्रेसचे सचिव कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२) रा. कोल्हारी, रामदास सीताराम मडावी (५५) रा. सिंदेवाही यांच्यासह इतर तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.