Nagpurcity

Simply The Best City

युवा ऑलिम्पिक: भारताची नेमबाज मनू भाकरचा सुवर्णवेध

भारताची १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने युवा ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. मनूने २३६.५ अंकांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला युवा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मिळालेले हे पहिलेवहिले सुवर्णपदक आहे.