Nagpurcity

Simply The Best City

व्हायोलिनचा तारा निखळला; पं. डी. के. दातार यांचे निधन

प्रख्यात व्हायोलिनवादक डी. के. दातार (८६) यांचे वृद्धपकाळाने बुधवारी रात्री १०.२० च्या सुमारास गोरेगाव येथील रुग्णालयात निधन झाले. सप्टेंबरमध्ये त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गोरेगाव येथील राहत्या घरी परत आणल्यानंतर सुश्रेषेसाठी डॉ. सुधा दातार यांच्या रुग्णालयात दाखल केले होते.