Nagpur City

Simply The Best City

MeToo: सुभाष घई यांच्यावर महिलेचा बलात्काराचा आरोप

‘मी टू’ वादळात आता बॉलिवूडचे ‘शो मॅन’ अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचेही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर आरोप केले आहेत. घई यांनी ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजले व नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे.