Nagpurcity

Simply The Best City

शत्रुघ्न सिन्हा थेट मोदींना भिडणार; काशीतून लढणार?

पक्षशिस्त मोडून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्यानं टीकेची धार धरणारे भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याच्या विचारात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघातून मोदींच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षानं त्यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचंही समजतं.