Nagpur City

Simply The Best City

सरन्यायाधीशांची ऑर्डर!! न्यायमूर्तींच्या सुट्ट्या रद्द

न्यायालयात लाखोंच्या संख्येने खटले प्रलंबित आहेत. नुकतेच सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतलेल्या रंजन गोगोई यांनी सर्वात आधी या प्रलंबित खटल्यांना मार्गी लावण्याच्या उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी कार्यालयीन दिवसांमध्ये ‘नो लिव्ह’ हा फॉर्म्युला काढला आहे. न्यायालयांना सार्वजनिक सुट्ट्या असतातच, त्यामुळे इतर कार्यालयीन दिवशी न्यायाधीशांना रजा बॅन करण्यात आली आहे.