Nagpurcity

Simply The Best City

‘तितली’चा कहर: ओडिशात दरड कोसळून १२ जण ठार

तितली वादळाचा तडाखा आणि मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशात हाहाकार माजला आहे. ओडिशातच ३ लाख लोकांना वादळाचा फटका बसला आहे. ओडिशातील गजपती जिल्ह्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता आहेत. आंध्र प्रदेशातही आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.