Nagpurcity

Simply The Best City

शबरीमलात येणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करा; मल्याळी अभिनेत्यांचा डायलॉग

शबरीमला मंदिरात येणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवेत, असं वादग्रस्त विधान एका भाजप समर्थक मल्याळम अभिनेत्याने केलं आहे. सुप्रीम कोर्टाने अलीकडे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना जाण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयाने नाराज अभिनेते तुलसीधरन नायर (कोल्लम तुलसी) यांनी भाजप आयोजित रॅलीत हे वादग्रस्त वक्तव्य केले. दरम्यान, या वक्तव्यावर तुलसी यांनी नंतर माफी मागितली.