Nagpurcity

Simply The Best City

खुशखबर, आता दारुही मिळणार घरपोच? अपघात रोखण्यासाठी निर्णय

नशाबाजांसाठी आणि त्याहूनही त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आता एक असं धोरण राबवण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होईल! ड्रंक अँड ड्राइव्ह केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे. जर अशी घरपोच दारू मिळाली तर महाराष्ट्र हे दारू घरपोच देणारं देशातलं पहिलं राज्य असेल.