रुग्णालयांचा गोरखधंदा
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना उपचाराची नवसंजीवनी मिळावी यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे सुरक्षा कवच दिले. युती सरकारच्या काळात त्याचे महात्मा फुले जन आरोग्य अभियान असे त्याचे नामकरण झाले. सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेचा गैरफायदा खासगी रुग्णालयांनी उठवला.