Nagpur City

Simply The Best City

चेतन भगत यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले

प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप फेटाळताना त्यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या ई-मेलचा स्क्रिन शॉट शेअर केला आहे. तसेच ‘मी टू’ मोहिमेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करतानाच ही मोहीम घाणेरडी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.