Nagpurcity

Simply The Best City

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणास येणार वेग

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीचे भूसंपादन व आतापर्यंत झालेल्या कामाचा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. या महामार्गाच्या चौपदरीकरणास गती देऊन येत्या मार्चपर्यंत किमान दोन लेनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.