Nagpurcity

Simply The Best City

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वरून राजकारण रंगलं!

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १४३व्या जयंती निमित्त त्यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील साधू बेटावर होणार आहे. पण हा पुतळा भाजपची एक राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या पुतळ्यामुळे अनेक आदिवासींच्या जमीनी मोदी सरकारने हडपल्यात आरोप केला आहे.